Monday, November 14, 2011

Kande Pohe-Lyrics

भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हलावे मन आणि कांती
आयुष्य हे चुलीवरले कढईतले कांदे पोहे

नात्यांच्या ह्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि मग म्हणे तो वरचा जुळवी शतजन्मांच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
पण मग मिटुनी लाजळूपरी पुन्हा उघडण्यासाठी

दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागुनी ध्यानीमनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना
आयुष्य हे चुलीवरले कढईतले कांदे पोहे

भूतकाळाच्या धून अक्षता तांदूळ केले ज्यांनी
आणि सजवला खोटा रुखवत भाडयाच्या भांड्यांनी
भविष्य आता रंगवण्याचा अटट हास हि त्यांचा
हातावरच्या मेहेंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरले कढईतले कांदे पोहे

Vadal Vaat-Lyrics


थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले 
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्न पाखरांचा थवा उतरला ओंजळीत 

कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ, कधी हरवली वाट
वा-या पावसाची गाज, काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट